महापुरामुळे कोल्हापुर जिल्हात १२९८ कोटींचे नुकसान

कृषिकिंग : मागच्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या महापुरामध्ये विविध पिकांचे सुमारे १२९८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. ७८१०१ हेक्‍टर क्षेत्राला महापुराचा फटका बसला असल्याची माहिती पंचनाम्यातून पुढे आली.

महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार शेतकऱ्यांच्या पिकांची या महापुरामुळे हानी झाली आहे. महापुरात उसाचे सर्वाधिक ३९ टक्के नुकसान झाले. जिल्ह्यातील सुमारे ६१९९९ हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले. पुरानंतर राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्यास संगीतले होते. यानुसार कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यानुसार पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक गावात जाऊन पंचनामे करण्यात आले. यातून नुकसानीची आकडेवारी सामोरी आली आहे. पंचनामे करताना अतिवृष्टी व महापूर या दोन्हीमुळे होणारे नुकसान गृहीत धरण्यात आले. यानुसार पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

Read Previous

पावसामुळे गडचिरोली जिल्हात परिस्थिती गंभीर

Read Next

राज्यातला ६० लाख रोजगाराची यादी जाहीर करा – विजय वडेट्टीवार