नमस्कार मित्रांनो आज आपण अन्नद्रव्यांचे म्हणजे काय? अन्नद्रव्यांचे प्रकार किती व कोणते? अन्नद्रव्यांचा वापर कसा करावा? या बद्दल सविस्तर पाहणार आहोत.
अन्नद्रव्याचे मुख्य तीन प्रकार पडतात त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सुक्ष्म अन्नद्रव्ये,
- मुख्य अन्नद्रव्ये
- दुय्यम अन्नद्रव्ये
- सुक्ष्म अन्नद्रव्ये
मुख्य अन्नद्रव्ये
मुख्य अन्नद्रव्ये यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये पिकांकडून मोठ्या प्रमाणात शोषली जात असल्याने त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात.
- नायट्रोजन (N) १ ते ३%
- फॉस्फरस (P )- ०.०५ ते १.५%
- पोटॅशियम (K) – ० ३ ते ०.६%
- कार्बन (C) – ४३%
- हायड्रोजन (H) ६%
- ऑक्सिजन (0) – ४३ % (वनस्पतीच्या शुष्क वजनाच्या ९४ ते ९९.५% भाग )
दुय्यम अन्नद्रव्ये
- चुना (Ca), ०.१ ते ४%
- मॅग्नेशियम – ०.०५ ते १%
- गंधक -०.०५ ते १.५%
सुक्ष्म अन्नद्रव्ये
- लोह
- सिलीकॉन
- जस्त
- क्लोरीन
- मॉलिब्लेंडम
- कोबाल्ट
- बोरॉन
- मँगनीज
- व्हॅनेडिअम
- कॉपर
- सोडिअम इ.
वरील अन्नद्रव्यापैकी कार्बन व ऑक्सिजन हवेद्वारे तर हायड्रोजन पाण्याद्वारे पिकांना मिळतो. इतर सर्व अन्नद्रव्ये खनिजद्रव्ये समजली जातात. ते जमिनीच्या माध्यमातून पिकांना मिळतात.
पिकांच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्येआणि त्यांचे स्त्रोत
- जमीन आणि खतांमधून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्ये – मुख्य अन्नद्रव्ये = नत्र, स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्नद्रव्य आहेत.
- हवा आणि पाणी या मधून पुरवठा होणाऱ्या अन्नद्रव्ये – कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा हवा आणि पाण्यामधून होतो.
- सूक्ष्म अन्नद्रव्ये – लोह, मॅगेनीज, जस्त, तांबे, बोरॉन एखादी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.
- दुय्यम अन्नद्रव्ये – कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक त्यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात.