बांगर व आदिंनी १९८४ मध्ये माती दर्शक नकाशा तयार केला. त्यात कृषी हवामानानुसार महाराष्ट्राच्या मृदेचे आठ प्रकार केले आहेत. ते खालील प्रमाणे.
रेगूर मृदा –
- महाराष्ट्रातील ९०% मृदा बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. ही मृदा १०० सेमी पेक्षा कमी पर्जन्याच्या पठारी भागात समुद्र सपाटीपासून ३०० ते ९०० मी उंचीवर आढळते. या भागातील हवामान उष्ण व कोरडया स्वरूपाचे आहे.
- ही विम्ल प्रकारची मृदा आहे.
- या मृदेस काळा रंग टिटॅनिफेरस मॅनेटाईटमुळे येतो.
- या मृदेस उन्हाळयात आपोआप भेगा पडतात. त्यामुळे हवेचे मिश्रण होउन आपोआप मशागत होते. यास रेगूर असे म्हणतात. यात कापसाचे पीक घेतले जात असल्यामुळे तिला काळी कापसाची मृदा म्हणतात.
- ही मृदा ओली असतांना मशागत करणे अवघड असते. या मृदेस अतिरिक्त जलसिंचन झाल्यास पाणी साचून ती दलदलयुक्त बनते.
- या मृदेत कॅल्शिअम कार्बोनेट, पोटॅश व चुना ही पोषक तत्वे मुबलक असतात. तर फॉस्फरसची कमतरता असते.
- रेगूर मृदा ही परिपक्व मृदा आहे.
- रेगूरला नॅशनल अॅटलासमध्ये मंडलीय मृदा म्हणून संबोधतात. (Zonal soil
तांबडी मृदा
- ही मृदा काळया मृदेच्या विभागाभोवती आढळते. जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. जास्त पावसामुळे ती अॅसिडीक बनते, फेरस ऑक्साईडमुळे या मृदेस लाल रंग येतो. हिची निर्मिती अतिप्राचीन रूपांतरीत खडकापासून झाली आहे.
- यात सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजनची कमतरता असते तर लोह, कॅल्शिअम व अॅल्यूमिनियमचे प्रमाण जास्त असते.
- ही मृदा उत्तर कोकणात व त्या लगतच्या सहयाद्रीच्या माथ्यावर आढळते. या मृदा नापीक आहेत.
जांभी मृदा (लॅटेराईट)-
- आलटून पालटून सतत ओला व कोरडा ऋतू असणाऱ्या व २५० सेमी हून जास्त पावसाच्या प्रदेर्शात ही मृदा आढळते.
- यात हयूमसचे प्रमाण कमी असते. लोह व अॅल्यूमिनियम अधिक असते, तर कॅल्शिअम व मॅग्नेशियम कमी असते.
- भूमिगत पाणी व केशाकर्षणामुळे बेरीयम व सोडीयम खालच्या थरात जातात. लिचिंग क्रियेमुळे आयर्न ऑक्साईड तयार होतो.
- ही मृदा दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा प भाग, सहयाद्रीचा घाटमाथा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात आढळते.
- ही मृदा फळबागांसाठी उपयुक्त आहे.
तांबूस तपकिरी पिवळसर मृदा
- ही मृदा उत्तर कोकणातील उंच प्रदेशात वर्धा व वैनगंगेच्या खोऱ्यात (मुन विदर्भ) आढळते.
- ग्रॅनाईट, नीस इ. आर्कियन व विंध्य, कडप्पा प्रणालीतील खडकावर रासायनिक विदारण होउन तांबूस पिवळसर मृदा तयार होते.
- यात कॅल्शिअम अल्प प्रमाणात असते. आयर्न पेरॉक्साईडमुळे हिला तांबडा रंग येतो.
किनारी गाळाची मृदा-
- ही मृदा कोकणातील नद्यांनी वाहून आणलेल्या गांळापासून तयार झाली आहे. यात चिखल व रेतीचे प्रमाण अधिक असते.
- हिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे भात, नारळ, पोफळी, आंबा, फणस इ. चे उत्पादन घेतात.
- हिला भाबर मृदा असेही म्हणतात.
गाळाची मृदा (Old Alluvial Soil)
- तापी पुर्णा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे ३०० मी. उंचीचे गाळाचे थर सातपुडा व सातमाळा अजिंठा डोंगर रांगा दरम्यान झाले आहे. ही मृदा अत्यंत सुपिक आहे.
- यात उस, कापूस, केळी व गळीत धान्याचे उत्पादन होते.
- ही मृदा धुळे, नंदुरबार, जळगाव इ. जिल्हयात तसेच बुलढाणा व अकोला जिल्हयात पुर्णा नदीच्या खोऱ्यात आढळते.
जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक / जमिनीचा सामु (PH) – डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेन याने हायड्रोजन आयनांच्या घातांकावरून (PH) सामू ठरविले. H व OH (हायड्रॉक्सिल) कमीत कमी शुन्य (आम्ल) व जास्तीत जास्त १४ (अल्क) असतो. जमिनीच्या सामूवर अन्नद्रव्यांची उपलब्धता अवलंबून असते.