
ज्वारीच्या क्षेत्रात वाढ
पुणे : ता : ४ डिसेंबर २०१९ , चालू वर्षी रब्बी हंगामाच्या कृषी मंत्रालयाच्या रिपोर्ट नुसार ज्वारी लागवडीच्या क्षेत्रात वाढ झालेचे स्पष्ट होत आहे, गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या सप्तहात १६.७१ हेक्टर वर ज्वारीची लागवड होती तर या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या सप्तहात १८.४२ लाख हेक्टर वर ज्वारीची लागवड झालेली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ज्वारीची लागवड १.७१ लाख हेक्टर ने वाढली. असून अनुकूल हवामान असल्यास उत्पादन वाढीची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकूणच सगळ्याच भागात पाण्याची पातळी वाढलेली आहे. नापिकी किंवा पाण्याअभावी दरवर्षी खाली राहणाऱ्या क्षेत्रात उपल्बध असलेल्या पाण्यामुळे आणि जमिनीतील असलेल्या ओलाव्यामुळे शेतकऱ्यांचा कल ज्वारी लागवडी कडे वळत आहे.
चालू बाजारभाव आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी कृषिकिंग वेबसाईटला भेट द्या