मध्य प्रदेशात पण पावसाचा हाहाकार

कृषिकिंग : देशात गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य प्रदेशातील अनेक भागात देखील हाहाकार माजवला आहे. यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागातील घरे पूराच्या पाण्याने वाहून गेली आहेत. काही ठिकाणी लोकांना स्थलांतरीत करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनचे काम झपाटयाने सुरू आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे भोपाळ, मांडला आणि सिवनी जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जबलपूर, नरसिंगपूर, होशंगाबाद, हरदा यासह इतर भागात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read Previous

कडकनाथ फसवणूक प्रकरणी सांगलीत १६ ला मोर्चा

Read Next

आवक कमी झाल्याने कांदा महागला