पशु प्रजननसाठी महत्त्वाची खनिजे

कॅल्शिअम

दुग्धोत्पादन, हाडे व दातांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या आकुंचन प्रसरणासाठी कॅल्शिअम आवश्‍यक असते, याच्या कमतरतेमुळे प्रसूती सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो; कारण गर्भाशयाच्या स्नायूंचे आकुंचन प्रसरण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.

स्फुरद

दुग्धोत्पादन, चयापचय आणि दातांच्या मजबुतीसाठी स्फुरद आवश्‍यक असते, याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक्र अनियमित होते. गाभण जनावरामध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.

मॅग्नेशिअम

हाडे व दातांची मजबुती आणि प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकांवरील क्रियेसाठी मॅग्नेशिअम आवश्‍यक असते.

सल्फर

सल्फर प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकावरील क्रियेसाठी उपयोगी आणि ‘ब’ गटातील जीवनसत्त्व, थायमीन आणि बायोटीन यांचा घटक, तसेच मिथिओनिन आणि सिस्टीन या अमिनो आम्लांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असते.

सोडिअम व पोटॅशिअम

शरीरातील अभिसरणाचा तोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकवून ठेवण्यासाठी सोडिअम व पोटॅशिअम आवश्‍यक असते.

तांबे/ कोबाल्ट

तांबे/ कोबाल्ट रक्तातील हिमोग्लोबीन उत्पादन, पेशी समूहांच्या रक्तछटांसाठी आवश्‍यक, बऱ्याचशा धातुजन्य अंतस्रवांचे घटक आणि प्रजोत्पादन क्रियेसाठी महत्त्वाचे असते, याच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये वांझपणा दिसून येतो.

झिंक

नरांमध्ये शुक्रजंतूंच्या निर्मितीसाठी आणि लैंगिक अवयवाच्या प्राथमिक आणि त्यापुढील वाढीसाठी झिंक महत्त्वाचे असते, तसेच ‘अ’ जीवमनसत्त्व कार्यान्वित करते. वळूंची प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि वळूंकडून चांगल्या वीर्याची निर्मिती होण्यासाठी झिंक आवश्‍यक ठरते.

आयोडीन

आयोडीन कार्बोदकाच्या उत्पादनासाठी कार्य करणाऱ्या शरीरातील अनेक अंतस्रावांच्या (टी-३, टी-४) निर्मितीसाठी, त्याचबरोबर शारीरिक वाढीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी आवश्‍यक असते, याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक्र अनियमित होते. गर्भपात होऊन, मृत आणि दुबळे आणि केसविरहित, गालगुंड असलेले वासरू जन्माला येते. जनावर मुका माज दाखविते.

स्रोत – विकासपीडिया

Read Previous

हरभरा पिकाची लागवड २० टक्के वाढण्याची शक्यता

Read Next

कांदयाला चांगले बाजारभाव मिळण्यासाठी योग्य मार्केटिंग सिस्टम उभारण्याची गरज