त्यांना शेतकऱ्यांचे दुखः कसे कळणार : राजू शेट्टी

कृषिकिंग : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या मदतीवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

खरंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकदा बघावं, शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घ्याव्यात आणि ही तुटपुंजी मदत जाहीर करताना दहा वेळा विचार करावा, असे देखील राजू शेट्टी म्हणाले

Read Previous

हि मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : तुपकर

Read Next

डाळिंबाच्या आवकेत वाढ: भावात घसरण