पीक सल्ला: कांद्यावरील मर रोगाचे नियंत्रण

कृषिकिंग: मर रोग हा रोग स्क्लेरोशियम रॉल्फसी नावाच्या बुरशीमुळे होतो. यामुळे रोपे पिवळी पडतात. जमिनीलगतच्या रोपांच्या भाग मऊ पडतो. आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. या रोगामुळे रोपांचे 10 ते 90 टक्के नुकसान होते. लागवडीनंतर हा रोग कांद्याच्या शेतात देखील मोठया प्रमाणात पसरतो. खरीप हंगामातील हवामान या रोगास अनुकूल असते. अधिक आर्द्रता व 24 ते 30 अंश सें. तापमान या रोगाच्या बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते.

मर रोग नियंत्रणासाठीचे उपाय:
पेरणीपुर्वी बियांना डायथिथोकार्बामेट किंवा कार्बोक्सिसन हे औषधे दोन ते तीन ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे. रोपे नेहमी गादी वाफ्यावर तयार करावीत. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी. एवेढ करुन रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच तर दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन किंवा कार्बोक्सिनचे द्रावण ओतावे 20 ग्रॅम औषधे 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. 

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.

krushikingadmin

Read Previous

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ८ (१४)

Read Next

संतुलीत पशुआहारातील पाण्याचे महत्व