देशाच्या अन्नधान्य आयातीत मोठी घट

कृषिकिंग: भारताच्या अन्नधान्य आयातीत २०१८-१९ मध्ये मोठी घट झाल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली. प्रामुख्याने गहू आणि कडधान्यांची आयात घटल्याचा हा परिणाम आहे. देशात २०१८-१९ मध्ये २.७८ दशलक्ष टन अन्नधान्य आयात करण्यात आले. त्याचे मूल्य १.२१ अब्ज अमेिरकी डॉलर आहे. त्या आधीच्या हंगामात (२०१७-१८) देशात ७.५२ दशलक्ष टन अन्नधान्य आयात करण्यात आले होते. त्याचे मूल्य ३.३४ अब्ज अमेरिकी डॉलर होते. गहू आणि कडधान्यांच्या आयातीत मोठी घट नोंदविण्यात आली. देशात २०१७-१८ मध्ये ५.६१ दशलक्ष टन कडधान्य आणि १.६५ दशलक्ष टन गव्हाची आयात करण्यात आली. २०१८-१९ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे २.५३ दशलक्ष टन आणि २,७४६ टन एवढे खाली आले, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली.

krushikingadmin

Read Previous

एचटीबीटी कापसाचे पीक नष्ट करण्यास शेतकरी संघटनेचा विरोध

Read Next

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ८ (१४)