बिगर बासमती भाताची निर्यात घटणार

कृषिकिंग: यंदा बिगर बासमती भाताची निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. किमान आधारभूत किंमतीत झालेली वाढ आणि अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्यामुळे निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने यंदा भाताच्या किमान आधारभूत किंमतीत 3.7 टक्के वाढ केली. तसेच यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्यामुळे भात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जे काही उत्पादन होईल, त्यातील मोठा हिस्सा सरकारी खरेदीसाठी जाईल. भात निर्यात उद्योगाला सरकारकडून व्याजसवलतीची अपेक्षा होती. आधारभूत किंमतींत वाढ झाल्यामुळे भात निर्यात किफायतशीर ठरत नाही. सरकारने व्याजसवलत दिली असती तर निर्यात किफायतशीर होण्यासाठी मदत झाली असती. परंतु सरकारने दिलासा दिला नाही, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.केंद्र सरकारने गेल्या वर्षी (2018) आधारभूत किंमतीत 13 टक्के वाढ केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीही आधीच्या हंगामाच्या तुलनेत बिगर बासमती भाताच्या निर्यातीत 15 टक्के घट झाली होती.

krushikingadmin

Read Previous

यंदा खरीप कर्जवाटप केवळ 30 टक्के

Read Next

ऊस सल्ला: पोक्का बोईंग नियंत्रण उपाय