जमीन सुधारणा कायदे

कृषिकिंग: स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात जमीनदारी, महालवारी, व रयतवारी या जमीन धारणा अस्तित्वात होत्या.
जमीनदारी [कायमधारा] पद्धत-
ही पद्धत 1793 मध्ये काॅर्नवालिसने बंगाल प्रांतात सुरू केली.
यात गावचा जमीन महसूल गोळा करण्याचा हक्क लिलाव पद्धतीने दिला जाई.
ती व्यक्ति महसूल / शेतसारा वसुल करून सरकारी खजिन्यात भरत असे
महालवारी-
ही पद्धत प्रथम आग्रा व औंध प्रांतात सुरू झाली त्यानंतर पंजाब मध्ये सुरू झाली.
या पद्धतीत शेतसारा भरण्याची जबाबदारी संपूर्ण गावाची संयुक्त गावाची होती.
यात गावातील प्रमुखास लंबदार म्हणत.
रयतवारी –
ही पद्धत थॉमस मॅन्रो याने 1820 मध्ये मद्रास प्रांतात सुरू केली.
यात प्रत्यक्ष शेतसारा भरण्याची जबाबदारी कसणार्या कुळाची होती.
ही पद्धत माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने मुंबई प्रांतात सुरू केली.

krushikingadmin

Read Previous

मुरघास निर्मिती: दुग्धविकासाची गुरूकिल्ली

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा