चारा पिके घेण्याची हायड्रोपोनिक्स पद्धत

कृषिकिंग: ह्या पद्धतीकरिता मातीची आवश्यकता लागत नाही. त्यासाठी विशिष्ट वातावरण तयार करावे लागते.
– हे वातावरण तयार करताना शेड, शेडमध्ये जाळीच्या खोल्या (शेडनेट) कराव्या लागतात. 
– चारा पिकविण्याकरिता विशिष्ट उंची असलेले प्लास्टिक ट्रे तयार करावे लागतात. हे ट्रे ठेवण्यासाठी रॅक मांडणी तयार करावी लागते. 
– वातावरण निर्मितीत १४ ते १६ तास सतत प्रकाश, २० ते २२ डिग्री सें. ग्रेड (७० डी. फॅ.) तापमान, ६० ते ६५% आर्द्रता ह्या गोष्टी बारकाइने कराव्या लागतात. या वातावरण निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारचे प्रकाशाचे बल्ब, तसेच पाण्याचे स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाची सोय करावी लागते. 
– ट्रेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे. 
– ज्याचा चारा करावयाचा आहे ते बियाणे १२ ते १५ तास चांगले भिजावे लागते. पाण्यात विरघळणारी खते वापरावी लागतात. 
– १ किलो बियापासून ८ ते १० दिवसात १० ते १२ किलो हिरवा पालेदार चारा (१० ते १२ इंच लांबीचा) मुळासकट मिळतो. ह्या चाऱ्याचे ड्रायमॅटर (शुष्क पदार्थ) १२ ते १५% असते. 
– चाऱ्याला बुरशी येऊ नये म्हणून बियाणे बुरशीनाशक रसायनात बुडविणे आवश्यक असते. 
– ह्या पद्धतीविषयी जगात अनेक वाद चालू आहेत. ह्याच धर्तीवर काही वर्षापूर्वी भारतात फॉडर मशीन आली होती. ती जेमतेम १ ते २ वर्षे चालली व बंद पडली. 

-डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०

krushikingadmin

Read Previous

पीक सल्ला: ऊस बेण्यांची प्रक्रिया करून लागवड फायदेशीर ठरते

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा