भारतातील पहिला बेट जिल्हा : माजुली बेट आसाम

कृषिकिंग: भारतातील पहिला बेट जिल्हा ( माजुली बेट आसाम)

● आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 400 km2 क्षेत्रफळ असणाऱ्या माजुली बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला 29 जून 2016 ला मान्यता देण्यात आली.
● पूर्वी माजुली बेट हे आसाम मधील जोरहाट जिल्ह्याचा उपविभाग होता.
● एखाद्या बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याची हि भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
● हा आसाम मधील 34 वा जिल्हा असेल.
● हे बेट ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्यात तयार झालेले डेल्टा क्षेत्र आहे.
● हे नदीच्या मध्यात तयार झालेले जगातील सर्वात मोठे डेल्टा क्षेत्र आहे.
● या बेटाच्या उत्तरेला सुबानसिरी नदी,दक्षिणेला मुख्य ब्रम्हपुत्रा नदी व ईशान्येला ब्रम्हपुत्राची वितरिका खेरकाटीय सुली.
● या बेटावर मिशिंग जमातीची संख्या जास्त आहे.
● समाजसुधारक संत श्रीमंता शंकरदेवा यांनी 15 व्या शतकात सुरू केलेल्या आसामी नववैष्णव संस्कृतीचे मुख्य क्षेत्र
● माजुली बेट जैवविविधतेने संपन्न आहे.
● जमिनीच्या धूप होण्याचे प्रमाण बेटावर जास्त आहे.1891 मध्ये याचे क्षेत्रफळ 1250 km2 होते आता ते 400 km2 च्या आसपास आहे.

krushikingadmin

Read Previous

जनावरांच्या आरोग्यासाठी औषधी वनस्पती एक वरदानच: तुळस व शरपुंखा

Read Next

आजचे अंड्याचे दर: रु/शेकडा