बटाटा उत्पादनात मोठी घट

कृषिकिंग : बिहार आणि उत्तरप्रदेश तसेच बटाटा उत्पादक असलेल्या प्रदेशात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  बटाटा उत्पादनात कमालीची घट आली असून बटाटाच्या बाजारभावात किंचित वाढ झालेली आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ९,६३,८३० टन इतके उत्पादन झाले होते तर या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील उत्पादन फक्त ८,१०,७७० टन इतके आहे. याचा परिणाम बाजारभावावर दिसून येत असून बटाटाचे बाजारभावामध्ये २ ते ३ रुपयाची वाढ किलो मागे दिसून येत आहे. बटाटा उत्पादनामध्ये अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात पावसाने खरीप हंगामात प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्याचे हक्काचे पीक असणाऱ्या बटाटाचे मोठे नुकसान झाले आहे. ठोक बाजारभाव ऑक्टोबर महिन्यात १२ ते १३ रुपये इतके होते तर सप्टेंबर महिन्यात ९ ते ११ इतके होते. 

अमेरिकेमध्ये सुद्धा उत्पादन कमी होणार

चालू वर्षी अमेरिकेमध्ये खराब हवामानामुळे बटाटा उत्पादनात ६ % घट येणार आहे. माती मधील अपुऱ्या घटकांमुळे तसेच चालू असलेल्या अतिथंडीमुळे उत्पादनात घट येणार आहे. याचा एकूणच बटाटा उत्पादनाच्या साखळीवर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेतील घटलेल्या उत्पादनामुळे उत्तम प्रतीचा बटाटा निर्यात करण्याची संधी इतर देशाना उपलब्ध होणार आहे.

Read Previous

राजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार ?

Read Next

…अखेर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर