पीक सल्ला: भाजीपाला पिकांना नत्राचा दुसरा हप्ता द्या

कृषिकिंग,अकोला: पिकांना नत्राचा दुसरा हप्ता देण्यासाठी प्रत्येक पिकास उदा. वांगी करीता 30 किलो,वाल करीता 10 किलो, टोमॅटो करीता 37.50 ते 50 किलेा, फुलकोबी करीता 50 किलो आणि चवळी तसेच गवार करीता 12.5 किलो हेक्टरी या प्रमाणात खत दयावे. तसेच (शिरी व चोपडा)दोडका,दुधी भोपळा, भेंडी, काकडी, कारली व ढेमसे या पिकांना हेक्टरी 12.5 किलो नत्र दयावा.

-डॉ. एस.एम. घावडे
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला.

Read Previous

कृषीदिंडी – तुका आकाशाएवढा

Read Next

निकृष्ट चाऱ्यामुळे म्हशीवर होणारे परिणाम