उसाला प्रतिक्विंटल ३० रुपये अनुदान द्या, उत्तर प्रदेशात साखर कारखान्याची मागणी

कृषिकिंग : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. यंदाचे गाळप सुरू झाले तरीही गेल्या हंगामातील शेतकऱ्यांची ४ हजार ६०० कोटी रुपयांची देणी साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची देणी देता यावीत यासाठी राज्य सरकारने उसाला प्रतिक्विंटल ३० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यातील कारखान्यांनी केली आहे.

गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर कारखाने शेतकऱ्यांची थकबाकी देऊ शकले नाही. थकबाकीसाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र कारखान्यांकडून देणी चुकती करता आली नाही. बगॅसपासून सहवीज निर्मितीसाठी एकतर्फी आणि अवास्तव निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम कारखान्यांवर झाला. वीज कंपनी खरेदी करत असलेले विजेचे दर आणि बगॅसचे दर यात मोठा फरक आहे. त्यामुळे कारखान्यांना नकद एक हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला.गेल्या हंगामातील शेतकऱ्यांची ४ हजार ६०० कोटी रुपयांची देणी साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची देणी देता यावीत यासाठी राज्य सरकारने उसाला प्रतिक्विंटल ३० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राज्यातील कारखान्यांनी केली आहे.

Read Previous

गाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा : भाग ०२

Read Next

दुधाचे थकीत अनुदान वाटपाची शक्यता