कापसाला १ हजार बोनस द्या – विजय जावंधिया

कृषिकिंग : भारतीय कापूस महामंडळाकडे जुन्या ८ लाख गायीचा साठा आहे, त्यात जागतिक बाजारपेठेत सुताचे दर कमी होत आहेत. त्यामुळे येत्या हंगामात ५ हजार ५५० रुपयाला देखील कापूस खरेदी होणे शक्य आहे. त्यामुळे कापसाला प्रतिक्विटल १ हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केली आहे.

विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली आहे.जावंधिया यांनी पत्रात लिहले आहे, अमेरिका आणि जागतिक बाजार पेठेत मंदी असल्याचे चित्र आहे. भारतात कापसाची आयात वाढली आहे, यंदाच्या वर्षी इतिहासात सर्वाधिक ३० लाख गाठींची आयात झाली आहे. सरकारने २०१९ -२० साठी १०० रुपये बोनस जाहीर केला आहे. तरीही कापसाची आयात, शिल्लक कापूस यामुळे ५ हजार ५०० रुपये दर देणे शक्य नाही. त्यामुळे प्रतिक्विटल १ हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केली आहे

Read Previous

साखरेच्या निर्यातीला केंद्र शासनाची परवानगी

Read Next

शेळीपालनात निरीक्षणाचे महत्व