…अखेर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर

कृषिकिंग : परतीच्या मान्सूनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. राजभवनामधून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

Read Previous

बटाटा उत्पादनात मोठी घट

Read Next

आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत : अशोक चव्हाण