शेतकरी आत्महत्या वरून सरकारला घेरणार – खर्गे

कृषिकिंग : युती सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. राज्यातील जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूरस्थिती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या प्रश्नावरती काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सरकारला घेरणार आहे. असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वॉररूमचे खर्गे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. खर्गे म्हणाले, की अविनाश पांडे यांच्या नेतृत्वाखाली अद्ययावत वॉररूमच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन आणि समन्वय साधला जाणार आहे. या वॉररूमच्या माध्यमातून स्टार प्रचारकांच्या सभांचा समन्वय, सोशल मीडियावरील प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे. उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि कायदेशीर मदत व सल्ला दिला जाणार आहे.

Read Previous

आघाडी सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी, जाहीरनाम्यात घोषणा

Read Next

स्वाभिमानी शेतकरी संघटना पाच जागा लढणार