शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार : उद्धव ठाकरे

कृषिकिंग : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगितले. उद्धव ठाकरे नारायणगाव येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. त्यावेळी बोलताना चहूबाजूंनी विचित्र संकट घोंगवत आहे. त्यामुळे मी युती केली. मी भाजपसोबत गेलो, असे देखील युतीबाबत बोलताना ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कि सत्तेच्या आसपास पोहचत नसल्याने विरोधकांकडून काहीही बोलले जात आहे. आम्ही चांगल्या योजना आणतोय तर तुम्ही आडवे का येत आहात, असा सवालही त्यांनी यावेळी विरोधकांना केला. 10 रुपये जेवण आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी ही करणार असा निर्धारही त्यांनी यावेळी केला.

Read Previous

समुद्रात जाणारे पाणी वळवणार – फडणवीस

Read Next

सरकार येताच २४ तासात कर्जमाफी, हरियाना कॉंग्रेसचा जाहीरनामा