शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्यावर भरः पंतप्रधान

कृषिकिंग: देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झालेला असून आता शेतकऱ्यांना शेतमाल आणि मूल्यवर्धित उत्पादनांचे निर्यातदार बनविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील सभेत व्यक्त केले. शेती उत्पादने आणि मत्स्योत्पादन यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या पाच वर्षांत रस्ते, बंदरे आदी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

“पायाभूत सुविधा चांगल्या नसतील तर अर्थव्यवस्था वेग घेणार नाही. गाव-खेड्यांमध्ये शेतमाल साठवणुकीच्या सुविधा उभारण्यापासून ते शहरांत अत्याधुनिक सुविधा उभारण्यापर्यंत अनेक पायाभूत सुविधा आम्ही निर्माण करत आहोत. महामार्ग, रेल्वेमार्ग, हवाईमार्ग, जलमार्ग, आय-वे, डिजिटल पायाभूत सुविधा, ब्रॉडबॅन्ड सुविधा आदींच्या निर्मितीवर आम्ही लक्ष दिले आहे. येत्या पाच वर्षांत या पायाभूत सुविधांसाठी आम्ही 100 ट्रिलयन रूपये खर्च करणार आहोत, “ असे पंतप्रधान म्हणाले.

Read Previous

सिक्कीम जगातील पहिले ‘ऑर्गेनिक स्टेट’

Read Next

यांत्रिक ऊस तोडणीसाठी अनुदान देण्याची पध्दत चुकीचीः सहकारमंत्री