भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या – शरद पवार

कृषिकिंग : राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती उभारून अनेकांना रोजगार दिले. आमच्याच सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वांत मोठी कर्जमाफी केली. पण २०१४ ला आलेल्या भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. तर दुसरीकडे उद्योग बंद पडून बेरोजगारीदेखील वाढत आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी कााँग्रेचे अध्यक्ष शरद पवार हे म्हणाले.

बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘आम्हाला चार वेळा मुख्यमंत्रिपद, कृषिमंत्रिपद, संरक्षण मंत्रिपद अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या. आता नवीन नेतृत्वाची पिढी तयार करून त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. बीडमध्ये नव्या नेतृत्वाला पसंती असल्याचे चित्र आहे.

Read Previous

सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होणार : निर्यातवाढीसाठी सरकारी प्रयत्नांची गरज

Read Next

मान्सूनने घेतला देशाचा निरोप