महायुतीच्या सभावर बहिष्कार घाला – शेतकरी संघटना

कृषिकिंग : निवडणुका जिंकण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांचा बळी देण्याची सुरू झालेली प्रथा बंद झाली पाहिजे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत शिवसेना-भाजप महायुतीच्या सभांवर बहिष्कार घाला, त्यांना मते देऊ नका असे आवाहन देखील घनवट यांनी केले. नगरला येथील व्यापारी भवनमध्ये शेतकरी संघटनेची उच्चाधिकार बैठक झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. घनवट बोलत होते.

यावेळी बोलताना घनवट म्हणाले कि कांद्यावरील निर्बंध हटेपर्यंत कांदा व्यापार बंद ठेवण्यात येईल व शेतकऱ्यांना पूर्ण व्यापार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिले जात नाही तो पर्यंत भाजप- शिवसेनेच्या सभांवर बहिष्कार घालणे व त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याची भूमिका शेतकरी घेतील. शहरी ग्राहक संघटित मतांच्या ताकदीवर सरकारे पाडतात. त्यांची दहशत राज्यकर्त्यांच्या मनावर आहे. निवडून येण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांचा बळी दिला जातो. कोणताही असा निर्णय घेण्याअगोदर सरकार कांदा व्यापारी किंवा शेतकरी प्रतिनिधींचा विचार घेण्याची तसदी सुद्धा घेत नाही हे अत्यंत घातक आहे. या पुढे असा अन्याय सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपल्या मताचा हिस्का दाखवून द्यावा. शासनाने शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करून निर्बंध हटविण्याबाबत चर्चा करावी, अशी अपेक्षा श्री. घनवट यांनी व्यक्त केली.

Read Previous

कांद्यासाठी आजपासून कांदा सत्याग्रह आंदोलन

Read Next

मुंबईच्या ‘आरे’ मधील वृक्षतोड थांबवा : न्यायालय