दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा अजेंडा – मुख्यमंत्री

कृषिकिंग : सोलापूरसह अन्य नजीकच्या जिल्ह्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी भाजप-शिवसेना महायुती कटिबद्ध आहे. कोल्हापूर, सांगली या भागातील पुराचे पाणी सोलापूरकडे वळवण्यासाठी योजना आखत आहोत. या जिल्ह्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना महत्त्वाची आहे आणि ती आम्ही राबवणारच, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा येथे आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महायुतीच्या सरकारने पाच वर्षात केलेला पारदर्शी कारभार आणि विकासकामाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही सत्तेत येऊ. या पाच वर्षात अनेक निर्णय आम्ही घेतले. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. दुष्काळ निधी दिला. अतिवृष्टीत मदत केली. ट्रॅक्‍टरसाठी अनुदान दिले. जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. सामान्यांच्या उपचारासाठी मदत केली. जलयुक्त शिवारसारख्या योजनेतून मोठे काम उभे राहिले. अनेक निर्णय सांगता येण्यासारखे आहेत. शेतकरी आणि सामान्य माणूस पहिल्यापासूनच आम्ही केंद्रबिंदू मानला. पण विरोधी पक्ष आज गलितगात्र झाला आहे. सोलापूरच नव्हे, तर आगामी काळात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आमचा अजेंडा असेल, असेही ते म्हणाले.

Read Previous

कांदा निर्बंधाविरोधात १५ तारखेला सांगली मार्केट बंद

Read Next

कांदा बाजारभाव विश्लेषण