कांदा सल्ला: कांदा काढण्याअगोदर हे करा..

काढणीस तयार असलेल्या रांगडा कांद्यासाठी
१. कांदा काढणीच्या १०-१५ दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे.
२. पिकाची काढणी ५० टक्के माना पडल्यानंतर करावी.
३. कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा.
४. कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब मान (नाळ) ठेवून कापावी. नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत.
५. उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत १०-१२ दिवस राहू द्यावे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे,डॉ.ए.थंगासामी,डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८*

Read Previous

गहू लागवडीस उशीर : उत्पादनात घट होण्याचा प्राथमिक अंदाज

Read Next

जैविक कीटकनाशक :व्हर्टिसिलिअम लेकॅनी