राज्यात पिकविम्याचे प्रमाण घटले

कृषिकिंग: यंदा उशीरा झालेला पाऊस आणि मराठवाडा, विदर्भात अजूनही पावसाने दिलेली ओढ यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे यंदा पिकविमा काढण्याचे प्रमाण वाढणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. यंदा पंतप्रधान पिकविमा योजनेसाठी चालू खरीप हंगामात आत्तापर्यंत राज्यात तीन लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा उतरविण्यात आला आहे. राज्यात गेल्या हंगामात ५६.१५ लाख हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविला होता. यंदा शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी भरलेली रक्कम २९ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ४९९ कोटी रुपये होती. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना यंदा विमा हप्ता भरण्यासाठी २४ जुलै ही शेवटची तारीख आहे.

Read Previous

झिरो बजेट शेतीवर विजय जावंधियांची टीका

Read Next

यंदा खरीप कर्जवाटप केवळ 30 टक्के