टोमॅटोच्या बाजार भावात घट

कृषिकिंग : पुणे मार्केट यार्ड मध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोची आवक वाढली असून टोमॅटो बाजारभावात घट आलेली आहे. टोमॅटोची सोमवारची आवक ५ ते ६ हजार केरटची आवक झाली असून बाजारभाव १०० ते २०० रुपये प्रति १० किलो दरम्यान आहे. तर सर्व साधारण दर १४० (१४ रुपये प्रति किलो) भेटला.

मुंबई मार्केट मध्ये तुलनेने जास्त बाजारभाव राहिला असून २०० ते २५० रुपये बाजारभाव राहिला या मध्ये ६७० गाड्यांची आवक नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती झालेली होती. पुणे आणि मुंबई दोन्ही बाजारपेठेमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज आवक जास्त राहिली असून बाजारभाव खाली आलेले आहेत.

Read Previous

टोमॅटो उत्पादनात २० टक्के घट, तरीही अपेक्षित बाजारभाव नाही

Read Next

शेतकरी प्रश्नांसाठी ८ जानेवारीला ग्रामीण भारत बंद