रब्बीच्या पीकविम्यासाठी ३१ डिसेंबर मुदत

कृषिकिंग : रब्बीच्या सहा पिकांसाठी राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. विम्यासाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.  “बागायती गहू, बागायती व जिरायती ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सहा पिकांसाठी विमा योजना लागू केली केली आहे.

यात कांद्यासाठी पाच टक्के तर इतर सर्व पिकांसाठी दीड टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी रिलायन्स, भारती एक्सा, बजाज अलियान्झ आणि फ्युचर जनरल इन्शुरन्स अशा चार खासगी कंपन्यांनी विम्याचे कंत्राट मिळविले आहे,” शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आणि कांद्यासाठी ३१ डिसेंबर तर भात आणि भुईमुगासाठी एक एप्रिल ही अंतिम मुदत राहील. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी आपल्या बॅंक खात्यातून विविध कार्यकारी सोसायटीकडे, बॅंकेत, आपले सेवा केंद्रात किंवा विमा प्रतिनिधीमार्फत विमा हप्ता जमा करू शकतील.

Read Previous

शेतकरी प्रश्नांसाठी ८ जानेवारीला ग्रामीण भारत बंद

Read Next

मका दोन हजारावर, पुढे काय?