सरकार येताच २४ तासात कर्जमाफी, हरियाना कॉंग्रेसचा जाहीरनामा

कृषिकिंग : महाराष्ट्र राज्यासोबत हरियाणा मध्ये देखील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. हरियाना विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये सत्तेत आल्यानंतर पहिल्या २४ तासांत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्याचबरोबर सरकारी नोकरीत महिलांना 33 टक्के आरक्षणाचीही घोषणा करण्यात आली आहे.

हरियाना कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील घोषणा शेतकरी कर्जमाफी सोबत अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पीक गेल्यास प्रतिएकर 12 हजार रुपये नुकसान भरपाई, प्रतिमहिना 300 युनिट वीज मोफत, युवकांना रोजगार मिळेपर्यंत प्रत्येक पदवीधराला 7 हजार रुपये आणि पदव्युत्तर पदवी असलेल्यांना 10 हजार रुपये मासिक भत्ता अशा अनेक घोषणा काँग्रेसने जाहीरनाम्यात केल्या आहेत.

Read Previous

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून चिंतामुक्त करणार : उद्धव ठाकरे

Read Next

फडणवीसांच्या काळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज – राज ठाकरे