सत्तेत आल्यास चार महिन्यात कर्जमाफी – राहुल गांधी

कृषिकिंग : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्षाचे सरकार राज्यात सत्तेत आल्यास चार महिन्यात संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले कि शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना निकष आणि उद्योजकांना विनाअट कर्जमाफी देणाऱ्या सरकारकडून शेतकऱ्यांचे हित जपले जाणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस मित्रपक्षाकडे सत्ता द्या. आमच्या हाती सरकार द्या. चार महिन्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. असे राहुल गांधी म्हणाले.

Read Previous

उसाला संतुलित खत – भाग २

Read Next

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्जमुक्ती – उद्धव ठाकरे