हरभरा पिकाची लागवड २० टक्के वाढण्याची शक्यता

कृषिकिंग : राज्यात यंदा रब्बी हरभरा पिकाचा पेरा वाढणार असून हरभरा लागवडी मध्ये २०%  वाढ होईल, असे तज्ञांचे मत आहे. राज्यात दरवर्षी ५५ ते ५६ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होतो. या मध्ये ज्वारीचा पेरा १२ लाख हेक्टरच्या दरम्यान असतो. यंदा रब्बीचा पेरा ७० लाख हेक्टर पर्यंत जाईल असे तज्ज्ञांचे मत आहे. 

यंदा १५ टक्के शेतकरी चांगल्या पाऊस आणि पाणी उपलब्ध झाल्याने हरभरा पिकाकडे वळतील. शेतकऱ्यांनी २०१७-१८ मध्ये हरभरा पिकाचा पेरा २० लाख हेक्टर वर नेला होता. परंतु २०१८ मध्ये कमी पावसामुळे हरभराचा पेरा कमी झाला होता, यंदा चांगल्या पावसामुळे तो पेरा वाढेल असे सांगण्यात येत आहे .रब्बीचा हंगाम चालू झालेला असून बी- बियाणाची विक्री सुरु झाली आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे गेला असून रब्बी हंगामातील कांदा, गहू, ज्वारी, हरभरा या पिकांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. 

Read Previous

सोयाबीनच्या भावामध्ये १५ ते १६ रुपयांची वाढ

Read Next

पशु प्रजननसाठी महत्त्वाची खनिजे