पीक सल्ला: कांद्यावरील मानकुज रोगाचे नियंत्रण

कृषिकिंग: कांदा साठवणुकीमध्ये नुकसान करणाऱ्या अनेक रोगांमध्ये मानकूज हा एक अत्यंत महत्त्वाचा रोग असून या रोगामुळे कांदयाचे ५० टक्के पर्यत नुकसान होऊ शकते. हा रोग बोट्रायटीस ॲली बुरशीमुळे होत असतो. या रोगाची लागण कांदा काढणीला आत असता होतो. रोगाची लक्षणे मात्र कांदा चाळीत भरल्यानंतर दिसू लागतात. रोगाची बुरशी पानाच्या जखमांमधून मानेपर्यत पोचतात. मानेतील पेशी मऊ होतात. कांदा उभा कापला असता मानेचा खालचा भाग शिजल्याप्रमाणे तपकिरी दिसतो. कांद्याच्या पापुद्रयामध्ये राखाडी रंगाची बुरशी वाढलेली दिसते. या रोगाची बुरशी जमिनीत सडके कांदे किंवा कांद्याचा पालापाचोळा यावर जिवंत राहते. कांदा काढल्यानंतर तो व्यवस्थित सुकवला गेला नाही आणि चाळीमध्ये ४० अंश सें.च्या वरती तापमान राहिले तर या रोगाचा प्रसार जोरात होत असतो. तसेच खर बियाण्यामार्फत देखील या रोगाचा प्रसार होत असतो.

नियंत्रणाचे उपाय:

डायथायोकार्बामेटची बिजप्रक्रिया करुन रोपे तयार करावीत. पिकाची फेरपालट करावी म्हणजे बुरशीचे जीवनचक्र थांबवता येते. काढणीपुर्वी कांदा पिकावर ०.२ टक्के २० ग्रॅम १० लिटर पाणी कार्बेन्डॅझिमची फवारणी करावी. कांदा काढणीनंतर दोन ते चार दिवस पातीसह शेतात सुकवावा.

डॉ.कुणाल सुर्यवंशी, श्रीमती श्वेता शेवाळे.
कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक.

Read Previous

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – १२(१४)

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा