द्राक्ष सल्ला: पिंकबेरी टाळण्यासाठी द्राक्षघड पेपरने झाका

द्राक्षघड पेपरने झाकणे जेव्हा बागेत किमान तापमान १० अंशच्यापेक्षा खाली येते व कमाल तापमान सुद्धा ३० अंशच्या पुढे जाते अशावेळी किमान व कमाल तापमानात जास्त तफावत वाढते. यामुळे *हिरव्या द्राक्षाजातींच्या द्राक्षमन्यात हिरवा असलेला हरीतद्रव्य हा गुलाबी रंगात बदलतो यालाच पिंकबेरी असे म्हटले जाते.* पिंकबेरी असलेली द्राक्षे गोड लागतात परंतु, अशी द्राक्षे खाल्ल्याने घशामध्ये खाज आल्यासारखे होते. तेव्हा ही परिस्थिती टाळण्याकरिता द्राक्षघड पेपरने झाकले जातात. पेपर झाकण्याची वेळ ही मन्यात पाणी उतरण्याच्या ८ दिवस आधी असते. यामुळे मन्यात गुलाबी रंग तयार होत नाही.

*-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे*

Read Previous

पोल्ट्रीधारक करणार जंतरमंतर वर आंदोलन

Read Next

राज्य सरकार करणार पाकिस्तान मधून कांदा आयात