लिंबूवर्गीय पीक सल्ला: नवीन लागवडीसाठी कलम निवड

कृषिकिंग,अकोला: संत्रा,मोसंबी,लिंबूच्या लहान झाडांना नत्र:स्फुरद: पालाशची मात्रा 1/3 द्यावी. नवीन संत्रा,मोसंबी,लिंबू बागांची लागवड करतांना कलम युतीचा जोड जमिनीपासून शक्य तितक्या वर राहील याची काळजी घ्यावी.लागवडीकरिता रोप निवडतांना रोगमुक्त पद्धतीने कलम निर्माण करणाऱ्या कडूनच घ्यावी. कलम ही रंगपूर किंवा जंबेरी खुंटावरच बांधलेली असावी.

डॉ. दिनेश ह. पैठणकर,डॉ. योगेश इंगळे,
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे, अकोला.

Read Previous

कृषीदिंडी- मि माझे चपळ

Read Next

गोचीड नाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावल्यानंतर उन्हात बांधु नये