मुख्यमंत्री फडणवीस यांचा राजीनामा

कृषिकिंग : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस उलटले तरी देखील सत्ता स्थापनेचा संघर्ष संपत नव्हता. त्यावर अखेर देवेंद्र फडणवीस पडदा टाकला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

विधानसभा निवडणूक शिवसेना भाजप सोबत लढले तरी निकालानंतर सत्ता स्थापनेतील वाट्यावरून सेना आणि भाजप यांच्यात एकमत न झाल्याने बराच काळ सत्ता स्थापनेचा संघर्ष चालला. आज अखेर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. परंतु सध्या राज्यपाल यांच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.

Read Previous

कांदा भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार पाच हजार टन कांदा आयात करणार

Read Next

पंचनाम्यासाठी २० लाख शेतकऱ्यांचे अर्ज : कृषी आयुक्त