आघाडीचा जाहीरनामा फसवा – मुख्यमंत्री

कृषिकिंग – आघाडी सरकारचा काळ जनतेने अनुभवला आहे. त्यांनी जनतेला भूलथापा दिल्या आहेत. आघाडीचा जाहीरनामा देखील असाच अनेक आश्वाससांनी भरलेला आहे. जाहीरनाम्यात देखील त्यांनी अशीच फसवी आश्वासने दिली आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

धुळे येथे प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, विरोधक निवडणुकीपूर्वीच हरले आहे. त्यांच्याकडे लढण्यासाठी उमेदवार देखील नाहीत. त्यामुळे ते कोणतीही आश्वासने देत आहेत. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

Read Previous

कांदा बाजारातील आवक मंदावलेलीच

Read Next

गूळनिर्मितीसाठी उसाच्या जाती