साखरेच्या निर्यातीला केंद्र शासनाची परवानगी

कृषिकिंग : यंदाच्या वर्षी देशातील साखरेचा वाढलेला साठा बघता ६० लाख टन निर्यातीला मान्यता देणारी अधिसूचना अखेर केंद्र शासनाने जारी केली आहे. निर्यातीला परवानगी देण्याची मागणी मागील काही दिवसापासून केली जात होती.

एक ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामाची सुरुवात आधीच्या १४५ लाख टन विक्रमी शिल्लक साखरेने होणार आहे. याशिवाय नव्या हंगामातून २६३ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, खप केवळ २६० लाख टनाचा होणार असल्याने निर्यात हाच एकमेव पर्याय देशाच्या हाती आहे, असे संघाचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयावर साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले कि “किमान ८० लाख टन साखर निर्यातीला परवानगी द्या, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून गेल्या तीन महिन्यांपासून केली जात होती. त्यासाठी अन्न, व्यापार आणि अर्थ विभागाची मंत्रालये, तसेच पंतप्रधान कार्यालयाशीदेखील आम्ही संपर्क करीत होतो. या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान आहे,”

Read Previous

भाजीपाला सल्ला: अशी करा पालक व मेथी लागवड

Read Next

कापसाला १ हजार बोनस द्या – विजय जावंधिया