राज्यातला ६० लाख रोजगाराची यादी जाहीर करा – विजय वडेट्टीवार

कृषिकिंग : राज्यात ६० लाख रोजगार निर्मिती केली असा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा खोटा आहे. त्यामुळे सरकारने कोणकोणत्या जिल्हात, कोणत्या कंपनीत किती रोजगार दिली याची यादी जाहीर करावी, अस आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या पाच वर्षातल्या चुकीच्या धोरणामुळे सरकार रोजगार निर्मिती मध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर युवकांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून खोटी आकडेवारी देण्याचा सरकार प्रयत्न करते आहे. सरकारने मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र या सरकारच्या संकल्पना अपयशी ठरल्या पाहिजे. त्यामुळे शेकडो छोटे उद्योग बंद पडले आहेत. परिणामी लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. राज्यात अशी परिस्थिती असताना उद्योगमंत्री सुभाष देसाई कोणत्या आधारावर ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा करीत आहेत, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Read Previous

महापुरामुळे कोल्हापुर जिल्हात १२९८ कोटींचे नुकसान

Read Next

पोल्ट्रीधारक करणार जंतरमंतर वर आंदोलन