पशुपालकांना पडणारे प्रश्न : गायी म्हशी व्यायतांना कोणती काळजी घ्यावी?

कृषिकिंग: गायी म्हशी व्यायतांना अडकलेली वार गर्भाशयात हात घालून काढावी की नाही याबद्दल अनेकांत दूमत आहे. खरेतर अनुभवी पशुवैद्यकाकडून ती व्यवस्थित काढावी. परंतु गाय/म्हैस व्यायल्यानंतर 9 ते 10 तासापर्यंतच गर्भाशयात हात टाकावा त्यानंतर गर्भाशयात हात घालणे गायी/म्हशीला वेदनाकारक होते. कारण गर्भाशयाचे तोंड अगदी अरुंद होते.
वार हातांनी काढल्यास किंवा तशीच गर्भाशयात अर्धवट किंवा पूर्ण राहिल्यास औषध पाण्याची योजनाही सर्व बाजूंनी म्हणजे पोटात / इंजेक्शनद्वारे तसेच गर्भाशयात केली गेली पाहिजे. साधारपणे कमीतकमी 4 दिवस तरी करावयास पाहिजे. त्यानंतर गर्भाशयातून दुर्गंधीयुक्त स्त्राव आल्यास हेच औषध पाणी थोडेफार बदलून पुढील थोडे दिवस करावे. 
साधारणपणे गर्भाशयातून स्त्राव 10 ते 12 दिवसापर्यंत पडल्यास काही हरकत नाही. अतिशय ताणलेली गर्भाशयाची पिशवी नेहमीच्या आकाराला येण्याकरिता हा स्त्राव बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. फक्त या स्त्रावाच्या वासाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

डॉ. वासुदेव सिधये, पशुतज्ज्ञ 

Read Previous

पीक सल्ला: द्राक्ष खुंटकाडी निवड

Read Next

आजचे अंड्याचे दर- रु/शेकडा