आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत : अशोक चव्हाण

कृषिकिंग : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यपालांच्या या निर्णयावर बोलताना कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले कि, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल. असा विश्वास त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.

Read Previous

…अखेर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर

Read Next

हि मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : तुपकर