विधानसभेसाठी राज्यभरातून ५५३४ उमेदवारी अर्ज

कृषिकिंग : विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.४) राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये ३७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. २८८ मतदारसंघांसाठी एकूण ५५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

श्री. शिंदे म्हणाले, की नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कँटानमेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वांत कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

Read Previous

मुंबईच्या ‘आरे’ मधील वृक्षतोड थांबवा : न्यायालय

Read Next

दूध भेसळीचे दुष्परिणाम